Mahesh Gaikwad
कोकम चवीला आंबट असणारे फळ असून जे प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोकण, गोवा आणि कर्नाटक भागात आढळते.
कोकम हे थंड प्रकृतीचे फळ असून याच्या सेवनामुळे शरीराला थंडावा मिळतो.
कोकममध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट आणि फायबर असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
कोकम खाल्ल्यामुळे अपचन, पित्त यासह पोटाच्या अन्य समस्यांपासून आराम मिळतो.
कोकममध्ये हायड्रॉक्सी सायट्रिक अॅसिड हा घटक असतो, जो चरबी कमी करण्यासाठी आणि भूक नियंत्रित करतो.
कोकमचे सेवन केल्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि ह्रदयविकाराच्या धोक्यापासून संरक्षण मिळते.
कोकममध्ये अँटी-ऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो मिळतो.
कोकममध्ये व्हिटामिन-सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरते.