Anuradha Vipat
कोकम सरबत हे उन्हाळ्यात शरीरासाठी 'नॅचरल एअर कंडिशनर' मानले जाते.
उन्हाळ्यात शरीरात वाढलेले पित्त आणि उष्णता कमी करून ते शरीराचे तापमान नैसर्गिकरित्या खाली आणते.
कोकम सरबत प्यायल्याने शरीरातील थंडावा टिकून राहतो आणि उष्माघाताचा धोका कमी होतो.
कोकममध्ये नैसर्गिक क्षार आणि पाणी असते, जे घामावाटे बाहेर पडणारे इलेक्ट्रोलाईट्स भरून काढतात
उन्हाळ्यात छातीत होणारी जळजळ आणि पोटातील उष्णता कोकममुळे त्वरित शांत होते.
शरीरातील अंतर्गत उष्णता कमी झाल्यामुळे उन्हाळ्यात येणारी घामधोरी किंवा त्वचेची खाज कमी होण्यास मदत होते.
कोकम सरबत घेतानापांढऱ्या साखरेऐवजी खडीसाखर किंवा गूळ घालून बनवलेले कोकम सरबत अधिक आरोग्यदायी ठरते.