Aslam Abdul Shanedivan
कोकम हे औषधी असून त्यास गार्सिनिया इंडिका असेही म्हणतात. हे लहान आकाराच्या जांभळ्या बेरीसारखे दिसतात.
कोकममध्ये पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. कोकम हृदयाचे आरोग्य, पचनसंस्था, त्वचा आणि इतर अनेक समस्यांसाठी फायदेशीर आहे.
कोकम तेलाचा वापर आपल्या त्वचेसाठी होऊ शकतो. कोकम त्वचा मुलायम ठेवण्यास मदत करते. तसेच त्वचा चमकदार राहते.
कोकममध्ये फायबर असल्यामुळे ते पचनासाठी खूप फायदेशीर आहे. कोकम आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो.
कोकममध्ये व्हिटॅमिन ई असते. जे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपला बचाव करतात. त्वचेशी संबंधित मुरुम, सुरकुत्या, जळजळ इत्यादी कमी करते.
कोकमचा रस बारीक करून काढता येतो. हा रस खूप चवदार आहे. त्यात साखर किंवा मीठ घालून प्यायल्याने त्याची चव आणखी वाढते.
ताज्या कोकमपासून ज्यूस बनवता येतो आणि त्याचा सेवनही करता येतो.