sandeep Shirguppe
नारळाचे पाणी हे आपल्याला हायड्रेट ठेवते. ते शरीरातील विषारी घटक काढून टाकते.
व्हिटॅमिन्स आणि मिनरल्ससोबतच त्यात अँटी-ऑक्सिडंट्सही मुबलक प्रमाणात आढळतात.
नारळ पाण्यात कॅलरीज आणि कोलेस्ट्रॉल अजिबात नसते. त्यामुळे ब्लडप्रेशर आणि हृदयविकारांवरही ते खूप फायदेशीर आहे.
नारळात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असे आवश्यक घटक असतात. तसेच यामध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात असते.
नारळाच्या पाण्यात पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित राखण्यास मदत होते. रक्तदाबावर नारळ पाणी एक चांगला पर्याय आहे.
नारळाच्या पाण्यात फक्त ९५ टक्के पाणी असते. त्यामुळे हे पाणी प्यायल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.
नारळ पाण्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. तसेच पचनसंस्था सुधारते.
नारळ पाणी प्यायल्याने शरीराची पीएच पातळी संतुलित राहते, ज्यामुळे चयापचय सुधारते.
नारळ पाणी प्यायल्याने आपल्या स्नायू आणि मज्जासंस्थेला आराम मिळतो. त्यामुळे सांधेदुखी कमी होते.
गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत नारळाचे पाणी पिण्याचे आवाहन करतात या पाण्यामुळे उलट्यांचा त्रास कमी होते.