Deepak Bhandigare
कोकममुळे अपचन, गॅस, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो
उन्हाळ्यात कोकमचा सरबत प्यायल्याने पोट थंड राहते आणि पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते
वजन कमी करण्यासाठी आहारात कोकमचा समावेश करावा, यात असलेले हायड्रॉक्सीसिट्रिक ॲसिड भूक नियंत्रित करण्यास मदत करते
कोकममध्ये व्हिटॅमिन सी असल्याने ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते, याचा आहारात समावेश केल्यास शरीर तंदुरुस्त राहते
कोकममध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण देण्यास मदत करतात
उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या जाणवू शकते, कोकममधील इलेक्ट्रोलाइट्स शरीराला हायड्रेट ठेवून आणि डिहायड्रेशन टाळण्यास मदत करतात, तसेच कोकम शरीराला थंडावा देण्याचे कामही करते
कोकममध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्याने त्वचा चमकदार राहते आणि केसही मजबूत होण्यास मदत होते
उन्हाळ्यात कोकमचा सरबत, सोलकढी प्या, हे शरीराला थंडावा देण्याचे काम करतात