Deepak Bhandigare
अननसमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठीही फायदेशीर आहे
वजन कमी करण्यासाठी अननस हे एक उत्तम फळ ठरू शकते, कारण त्यात फायबरचे प्रमाण अधिक आणि कॅलरीज, कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण तुलनेने कमी असते
अननसमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते
अननस हा ब्रोमेलेनचा नैसर्गिक स्रोत आहे, जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते, तसेच ते बद्धकोष्ठता टाळण्यासही उपयुक्त ठरते
अननसमध्ये आढळणारे उच्च फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, ही पोषक तत्त्वे कोलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात
बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या सर्दी आणि विषाणूजन्य संसर्गांपासून बचाव करण्यासाठी हे फळ खूप गुणकारी मानले जाते
जेवणानंतर काही प्रमाणात त्याचे सेवन करण्यास सांगितले जाते, यामुळे पोटातील गॅस कमी होऊ शकतो
अननसमधील नैसर्गिक साखर शरीराला त्वरित ऊर्जा देते तसेच ते स्नायूंच्या रिकव्हरीसाठी उपयुक्त ठरते