Anuradha Vipat
हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमा हा सण महत्त्वाचा मानला जातो. कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पितात.
दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते.
पौराणिक कथेनुसार एक सावकारला दोन मुली होत्या. सावकाराच्या दोन्ही मुली पौर्णिमेचे व्रत करत होत्या.
मोठी मुलगी हे व्रत अत्यंत श्रद्धेने आणि सर्व नियम पाळून करते पण लहान मुलगी व्रत अर्धवट ठेवत असे. त्यामुळे तिच्या घरात जन्मलेली मुले जिवंत राहत नव्हती.
एके दिवशी त्या लहाण मुलीने ब्राह्मणाला यामागील कारण विचारले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला की, 'तू पौर्णिमेचे व्रत नियमाने करत नाहीस, म्हणूनच मुझी मुलं लगेच मरण पावतात.
त्यानंतर सावकाराच्या लहान मुलीने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी विधीपूर्वक उपवास केला. त्यानंतर तिला एक लहान मुल झाला. मात्र, दुर्दैवाने त्या लहान बाळाचाही अल्पावधीतच मृत्यू झाला. या घटनेनंतर त्या मुलीने बाळाला एका पाटावर ठेवून तिच्या मोठ्या बहिणीला घरी बोलावले.
बहीण त्या पाटावर बसायला गेली तेव्हा तिच्याजवळ असलेली हंडी त्या मृत मुलाला लागली आणि ते बाळ अचानक रडू लागले. तेव्हापासून जो भाविक भक्तीभावाने कोजागिरी पौर्णिमाचे उपवास करतो त्याला चांगले फळ मिळेल अशी प्रथा सुरू झाली .