Anuradha Vipat
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सर्वच घरांमध्ये मसाला दूध बनवले जाते. मसाला दूध सगळ्यांचं खूप आवडते.
कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसाला दूध कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत
दूध, केशर , साखर, मसाला, जायफळ आणि कस्टर्ड पावडर
मसाला दूध बनवण्यासाठी सर्वप्रथम दूध पाणी न घालता उकळवा, नंतर त्यात साखर टाकून मिक्स करून घ्या.
साखर वितळल्यानंतर त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि दुधाचा मसाला टाका.
दुधाला उकळी आल्यानंतर त्यात तुम्ही काजू, बदाम, पिस्त्याचे बारीक तुकडे करुन टाका.
अशा पद्धतीने तयार होईल सोप्या पद्धतीने बनवलेले कोजागिरी पौर्णिमेचे मसाला दूध.