sandeep Shirguppe
यकृत हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा आणि सर्वात मोठा भाग आहे, जो शरीरात एकाच वेळी अनेक कार्ये करतो.
यकृताच्या कार्याला मजबुती देणारी फळे व भाज्यांचा समावेश आहारात असल्यास तो अधिक आरोग्यदायी ठरतो.
पपईमध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात जे यकृताच्या (लिव्हर) सेल्सची सूज कमी करण्यास मदत करतात.
द्राक्षांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट यकृताच्या पेशी निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे सूज रोखण्यास मदत होते.
अंजीरमध्ये उच्च प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट घटक असतात, जे फॅटी लिव्हरच्या समस्येपासून संरक्षण करण्यासाठी देखील काम करतात.
सफरचंद हे यकृत डिटॉक्स करण्यास मदत करते. यात असलेले पॉलिफेनॉल यकृतातील सीरम आणि लिपिड पातळी नियंत्रित ठेवते.
केळी यकृत मजबूत करण्याचे काम करते. तसेच फॅटी लिव्हरची समस्या कमी होण्यास मदत होते.
आहारात तोंडले, दुधी भोपळा या सारख्या भाज्या असाव्यात. डाळिंब ही यकृताच्या कार्यासाठी उपयुक्त ठरते.