Mahesh Gaikwad
आजकाल जगभरातील लोक आपल्या वैयक्तिक आरोग्याबाबत जागरूक झाल्याचे पाहायला मिळते. यासाठी अनेकजण व्यायामासोबतच आहारावर भर देताना दिसतात.
चांगले आरोग्य आणि फिटनेससाठी सकस आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.
सकस आणि संतुलित आहाराचे म्हणाल तर तुमच्या आहारामध्ये हरभरा ज्याला चणे असेही म्हणतात त्याचा समावेश असायलाच हवा.
पण अनेकदा पाण्यात भिजवलेले की भाजलेले चणे खावेत, हा प्रश्न अनेकांना पडतो. दोन्ही प्रकारे चने खाल्ले तरी ते आरोग्यासाठी फायदेशीरच असते.
भाजलेले चणे फायबरचा उत्तम स्त्रोत मानले जातात. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
तर भिजवलेले चणे खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून निघण्यास मदत होते.
भाजलेले चणे पचनासह हाडांच्या मजबूतीसाठीही फायदेशीर असतात. त्यामुळे ज्यांना हाडांचे दुखणे आहे, अशांनी भाजलेले चने अवश्य खावेत.
भिजवलेले चणे खाण्यामुळे पोटाच्या समस्या आणि स्नायूंच्या समस्यांपासून आराम मिळतो. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.