Mahesh Gaikwad
बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी खोकल्याच्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
आपल्याला सर्दी-खोकला झाला की, लहानपणी आई रात्री झोपताना हमखास हळद घातलेले दूध प्यायला द्यायची.
आज आपण हळद घातलेले दूध प्यायल्याने होणाऱ्या आरोग्याच्यासंबंधित फायद्यांबद्दलची माहिती पाहणार आहोत.
हळदीमध्ये करक्युमिन हा घटक सूज आणि रक्तदाब कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे दुधात हळद घालून पिणे फायदेशीर असते.
इन्फेक्शनमुळे घसा दुखत असल्यास गरम हळद दूध प्यायल्यामुळे घशाला शेक बसतो आणि आराम मिळतो.
अपचन, डायरियासारख्या पोटाच्या संबंधित समस्यांमध्येही हळद दूध पिणे फायदेशीर असते.
हळद घातलेल्या दुधात अँटी-इन्फ्लामेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुण असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात.
हळद दूध प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळीही सुधारण्यास मदत करते. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.