Pohe Benefits : नाश्त्यामध्ये पोहे आवडत नाही ; जाणून घ्या जबरदस्त फायदे

Mahesh Gaikwad

सकाळचा नाश्ता

भारतीय घरांमध्ये विशेषत: महाराष्ट्रातील घरात सकाळी-सकाळी नाश्त्यामध्ये खायला दिला जाणारा पदार्थ म्हणजे पोहे.

Pohe Benefits | Agrowon

पोह्याचा कार्यक्रम

एवढंच नाही तर आयुष्याचा जोडीदाराची पहिली नजरभेटही होते ती अॅरेंज मॅरेजमधील कांदे पोह्याच्या कार्यक्रमातच.

Pohe Benefits | Agrowon

पोहे खाण्याचे फायदे

कांदे पोह्याची महती ही आपल्याला एवढीच माहित असेल, पण नाश्त्यामध्ये पोहे खाण्याचेही अनेक फायदे आहेत.

Pohe Benefits | Agrowon

आहार

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतो. पण काही असे पदार्थ आहेत, जे खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण होतात.

Pohe Benefits | Agrowon

स्वादिष्ट पोहे

पोहे हाही असाच एक पदार्थ आहे. पोहे खायला तर स्वादिष्ट असतातच शिवाय ते बनवायला वेळही जास्त लागत नाही.

Pohe Benefits | Agrowon

पचनक्रिया

पोहे खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पोह्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात, ज्यामुळे बद्धकोष्टतेचा त्रास होत नाही.

Pohe Benefits | Agrowon

रक्तातील साखर

नाश्त्यामध्ये पोहे खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरही नियंत्रणात राहते. याशिवाय पोहे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे.

Pohe Benefits | Agrowon

उर्जा मिळते

पोह्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे पोहे नाश्त्यामध्ये खाल्लास दिवसभर उर्जा मिळते.

Pohe Benefits | Agrowon

वजन कमी होते

पोह्यामध्ये फॅट आणि कॅलरी यांचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

Pohe Benefits | Agrowon