Mahesh Gaikwad
भारतात मशरूमच्या विविध जाती पाहायला मिळतात. महाराष्ट्रातमध्ये याला अळिंबी या नावाने ओळखले जाते.
शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या लोकांना मशरूम खायला आवडतात. पण मशरूम केवळ खायलाच चांगले नाही, तर त्याचे आरोग्यासाठीही जबरदस्त फायदे आहेत.
मशरूमध्ये व्हिटामिन्स, मिनरल्स आणि अॅमिनो अॅसिडसारखे पोषक घटक असतात. जे आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात.
मशरूम हे नैसर्गिक अँटीबायोटीक आहे. मशरूमच्या सेवनामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
रक्तदाब निंयत्रणात ठेवण्यासाठी मशरूमची भाजी आहारात खाणे फायदेशीर असते. तसेच यामुळे ह्रदयाचे आरोग्यही सुधारते.
मशरूमधील पोषक घटकांमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. परिणामी ह्रदयरोगाचा धोका टळतो.
मशरूम खाणे डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर असते. यामध्ये साखर नसल्याने याच्या सेवनामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
याशिवाय मशरूम हे त्वचेच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. यामधील अँटी-एजिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत आणि त्वचा दिर्घकाळ तरूण राहण्यास मदत होते. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.