Team Agrowon
एखाद्या खाद्यपदार्थाचे पॅकेजिंग झाल्यानंतर त्या पदार्थाच्या मूलभूत अवस्था ओळखण्यासाठी किंवा पदार्थाबद्दल माहिती मिळविण्यासाठी पॅकेजिंगवर विशिष्ट लेबलिंग करणे आवश्यक असते.
पदार्थाचा तपशील हा मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असावा. या व्यतिरिक्त कोणत्याही भाषेचा वापर करता येणार नाही.
पदार्थावरील लेबलींग कोणत्याही प्रकारची दिशाभूल करणारे किंवा पदार्थाविषयी खोटी माहिती देणारे नसावे.
पदार्थाचे वर्णन करणारी पट्टी ही पॅकेजिंगच्या वस्तूपासून वेगळी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
लेबलींगवरील लेखन व्यवस्था ही सरळ, साध्या, स्पष्ट व सहज समजेल अशा सुवाच्य अक्षरात असावी.
परवाना क्रमांक स्पष्ट व सहज दिसणारा असावा. पदार्थात वापरण्यात आलेल्या घटकांची यादी ही घटकांचे वजन किंवा आकाराच्या प्रमाणानुसार उतरत्या क्रमाने असावी.
विशिष्ट पदार्थाच्या घटकासाठी विशिष्ट असे नाव वापरले जाते. उदा. वनस्पती खाद्य तेल- सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल इ.
पदार्थाच्या यादीमध्ये ज्या घटकांचे प्रमाण ५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्याचे नाव नाही लिहिले तरी चालते.