Pickle : जाणून घ्या लोणचे खराब होण्याची कारणे

Team Agrowon

भाज्यांच्या फोडीवर सुरकुत्या पडणे

काकडी किंवा काही भाज्यांच्या फोडी योग्य प्रमाणापेक्षा जास्त तीव्रतेच्या द्रावणात किंवा शिरक्यात मिसळल्यास फोडीवर सुरकुत्या पडतात. हे टाळण्यासाठी प्रथम सौम्य तीव्रतेचे मिठाचे द्रावण किंवा शिरका वापरावा. त्यानंतर हळूहळू त्याची तीव्रता वाढवावी.

Mango Pickle | agrowon

कडवटपणा येणे

लोणच्यामध्ये जास्त मसाला वापरल्यास किंवा त्याच्या सानिध्यात जास्त वेळ शिजवल्यास आणि जास्त तीव्रतेच्या शिरक्यामध्ये भाजी किंवा फळे मुरविल्यास कडवटपणा येतो.

Mango Pickle | agrowon

काळे पडणे

मीठ किंवा लोणच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यास लोणचे काळे पडते. - काही विशिष्ट बुरशीची वाढ झाल्याने लोणचे काळे पडते.

Pickle Making | Agrowon

फिक्कटपणा येणे किंवा फोडी मऊ पडणे

मिठाच्या द्रावणामध्ये भाज्या किंवा फळे पूर्णपणे न बुडविल्यास किंवा द्रावणाची तीव्रता आवश्यकतेपेक्षा कमी पडल्यास फोडी रंगाने फिक्या, मऊ पडतात किंवा बुळबुळीतपणा येतो.

Mango Pickle | agrowon

पृष्ठभागावर मळी तयार होणे

जीवाणूंच्या बरोबर लोणचे खराब करणाऱ्या जिवाणूंचा संसर्ग लोणच्यामध्ये होतो. अशा पद्धतीची मळी तयार होताच त्वरित काढून टाकावी. मिठाच्या द्रावणात काही प्रमाणात शिरका मिसळावा, त्यामुळे यीस्टचा प्रादुर्भाव टळतो.

Mango Pickle | agrowon

गढूळपणा येणे

मुरण्यासाठी ठेवलेल्या भाज्यामुळे काही वेळा शिरक्याला गढूळपणा येतो. असा प्रकार टणक आणि घट्ट पृष्ठभाग असलेल्या भाज्या आणि फळांच्या बाबतीत घडतो.

Mango Pickle | agrowon

लोणचे खराब होऊ नये म्हणून

लोणचे चांगले मुरेपर्यत खारामध्ये बुडून राहतील याची दक्षता घ्यावी. बरणीचे झाकणे वारंवार उघडू नये.

Mango Pickle | agrowon