Wild Vegetables Benefits :रोज एक रानभाजी खा आजार दूर करा, जाणून घ्या रानभाज्यांचे महत्व

sandeep Shirguppe

रानभाज्या महोत्सव

कोल्हापुरात रानभाज्या महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात जवळपास १५० हून अधिक औषधी वनस्पती प्रदर्षनात ठेवण्यात आल्या आहेत.

Wild Vegetables Benefits | agrowon

कोल्हापूकरांची गर्दी

पर्यावरण तज्ज्ञ मधूकर बाचूळकर आणि मिलींद धोंड यांच्या मार्गदशर्नाखाली हा महोत्सव भरवण्यात आला आहे. यामुळे कोल्हापुरातील अनेकांना रान भाज्यांचे महत्व पटत आहे.

Wild Vegetables Benefits | agrowon

पाथरी

पाथरीचा अंगरस जेष्ठमधाबरोबर दिल्यास बाळंतिणीचे दूध वाढते. हे चाटण कोरडया खोकल्यातही उपयोगी पडते. जनावरांना पाथरी चारा म्हणून वापरल्यास दूध वाढते.

Wild Vegetables Benefits | agrowon

काटेकोलसुंद

शरीरात वाढलेला पित्तदोष या भाजीच्या सेवनाने कमी होतो. मूतखडयासाठी ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. ही भाजी रूचकर व बळकट असल्याने शरीराचे नीट पोषण करते.

Wild Vegetables Benefits | agrowon

दिवा

दिव्याचे कंद, पाने औषधात वापरली जातात. याचा कंद भुकशामक म्हणून वापरला जातो. हा सकाळी शिजवून खाल्ला तर दिवसभर काही खाले नाही तरी चालते असे काही स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.

Wild Vegetables Benefits | agrowon

राजगिरा

राजगिऱ्यामुळे मलावष्टंभामुळे मूळव्याध, गुदभागी वेदना, रक्तस्त्राव होत असल्यास या भाजीच्या सेवनाने लक्षणे कमी होतात.

Wild Vegetables Benefits | agrowon

कुरडू

उन्हाळ्यातील गरमीमुळे आणि उष्ण गुणांची (आंबे, फणस इत्यादी) फळे खाऊन पोटाला आलेली उष्णता नाहीशी करण्यासाठी कुरडूची भाजी उपयुक्त आहे.

Wild Vegetables Benefits | agrowon

गुणगुणी

गुणगुणी ही भाजी गर्भपातक, पित्तरसाचा स्त्राव वाढविणारे, ज्वरनाशक, दुग्धवर्धक असून याच्या सेवनाने स्तनाच्या दुधात वाढ होते.

Wild Vegetables Benefits | agrowon

नाल

नाल ही भाजी प्रामुख्याने मूत्रवहस्तोतजन्य व्याधीवर उपयोगी पडते. ही भाजी थंड असून याने शौचास साफ होते. वरचेवर शौचास पातळ होत असेल तर याची कोरडी भाजी देतात.

Wild Vegetables Benefits | agrowon

नळीची भाजी

ही वनस्पती दुग्धवर्धक व कृमिनाशक गुणधर्माची आहे. पांढरे डाग, कुष्ठरोग, पित्तप्रकोप आणि तापात ही वनस्पती आहे. तसेच कफ व वातवर्धक आहे. ही वातानुलोमक असून दाह कमी करते.

Wild Vegetables Benefits | agrowon

सुरण

सुरण कंदाच्या भाजीने यकृताची क्रिया सुधारते आणि शौचास साफ होते. यामुळे बध्दकोष्ठता कमी होते. सुरणाच्या भाजीमुळे मूळव्याधीत रक्त तुंबून राहत नाही.

Wild Vegetables Benefits | agrowon
stress releif | Agrowon
आणखी पाहा...