Mahesh Gaikwad
अलिकडच्या काही काळात तरूणांसह वृध्दही निरोगी आरोग्याबाबत गंभीर असल्याचे दिसते.
परंतु काहीजण फिटनेसच्या बाबतीत जागरूक असल्याचे पाहायला मिळतात. निरोगी आणि पिळदार शरीरासाठी अनेकजण जीममध्ये तासंतास घाम गाळतात.
निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार आणि नियमित शारीरिक व्यायाम करणे आवश्यक आहे.
निरोगी आरोग्यासाठी चालणे, योग करणे यासारखे व्यायाम केले जातात. परंतू काहींना व्यायामाचाही कंटाळा असतो. अशांसाठी सायकल चालवणे उत्तम पर्याय आहे.
जर तुम्हालाही फिट अँड फाईन राहायचे असेल, तर सायकल चालविण्याचा व्यायाम तुमच्यासाठी बेस्ट आहे.
दररोज सायकल चालविण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी हा उत्कृष्ट व्यायाम प्रकार आहे.
शरीरातील वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सायकलिंगसारखा दुसरा व्यायाम नाही. तसेच रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
वाढत्या वयाच्या मुलांसाठी सायकल चालविण्याने स्नायूंची वाढ आणि मजबूतीसाठी फायदा होतो.