Mahesh Gaikwad
सध्या देशभरात हिंदू धर्मात पवित्र समजला जाणारा श्रावण महिना सुरू आहे. या महिन्यात अनेकजण भगवान शंकराची आराधना करतात.
पुराणात सांगितल्यानुसार, ज्या ज्या ठिकाणी भगवान शंकर प्रकट झाले, त्याठिकाणी जोतिर्लिंगांची स्थापना करण्यात आली. देशात बारा जोतिर्लिंग प्रसिध्द आहेत.
याशिवाय भारतात शंकराची हजारो मंदीरे आढळतात. ज्या मागे पौराणिक कथा आहेत. असंच एक मंदीर आहे जटोली शिव मंदीर.
हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात असणारे हे मंदीर भारतातीलच नाही, तर संपूर्ण आशियातील सर्वात उंच शिव मंदीर आहे.
या मंदिराची उंची सुमारे १११ फूट इतकी असल्याचे सांगितले जाते. तर मंदिरात प्रवेश करण्यासाठी १०० पायऱ्या चढून जावे लागते.
या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे मंदिराच्या दगडावर हाताने थापटल्यास डमरूचा आवाज ऐकू येतो. महान संत परमहंस यांनी १९८३ साली मंदीर परिसरात समाधी घेतल्याचे सांगितले जाते.
मंदीराच्या कळसावर ११ फुटांचा सोन्याचा कळस बसविण्यात आला आहे. ज्यामुळे याच्या सौंदर्यात अजूनच भर पडते.
महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त या मंदीरात येतात. हे मंदीर स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे.
या मंदीराची बांधणी दक्षिण द्रविड शैलीची आहे. हे मंदीर पूर्णत्साव येण्यास तब्बल ३९ वर्षांचा कालावधी लागला होता. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.