Mahesh Gaikwad
भारतीयांना आपल्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी कोणती ना कोणती तरी चटणी लागतेच.
भारतीय खाद्य पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांचे विशेष महत्त्व आहे. या चटण्यांमध्ये सर्वात आवडीने खाल्ली जाणारी चटणी म्हणजे पुदिन्याची चटणी.
पण पुदिन्याची चटणी केवळ चवीसाठीच नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे.
पुदिन्यामध्ये असे पोषक घटक असतात, जे पचनक्रिया सुधारण्यासाठीचे मदत करतात.
पुदिन्याची चटणी खाण्यामुळे बध्दकोष्ठता, गॅस, अपचन यासारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
पुदिन्यामध्ये आढळणाऱ्या औषधी घटकांमुळे शरीरातील गरमी कमी होते. त्यामुळे अनेक थंड पेयांमध्ये पुदिन्याची पाने घालतात.
याशिवाय पुदिन्यामध्ये व्हिटामिन-सी, कॅल्शिअम, फॉस्फरस आणि व्हिटामिन-बी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीही सुधारते.
पुदिन्यांच्या सुगंध हुंगल्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होतो. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.