Mahesh Gaikwad
सकाळचा नाश्ता असो वा सत्यनारायणाचा प्रसाद प्रत्येक घरात शीरा बनविलाच जातो. रव्यापासून शीरा, उपमा असे नाश्त्याचे पदार्थ तयार केले जातात.
रवा ही एक अशी गोष्ट आहे, जी प्रत्येत स्वयंपाक घरात असतेच असते. पण हाच रवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
तुम्हाला जर रव्याचे पदार्थ खायला आवडत नसतील, पण याचे आरोग्याचे फायदे ऐकल्यावर तुम्हीसुध्दा आजपासूनच रव्याचे पदार्थ खायला सुरू कराल.
रव्यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, झिंक आणि सोडियम या सारखे घटक असतात. जे आपल्या आरोग्याच्यादृष्टीने फायदेशीर असतात.
याशिवाय रव्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे तुमचे दिर्घकाळापर्यंत पोट भरलेले राहते.
पोट भरलेले राहिल्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही. परिणामी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
तसेच रव्यामध्ये असणारे मॅग्नेशिअम आणि डायटरी फायबर रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मदत करते.
याशिवाय रव्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. यामुळे विशेषत: स्त्रियांमध्ये अॅनिमियाची समस्या होत नाही. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.