Mahesh Gaikwad
आजकाल बदललेली लाईफ स्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकजणांना लठ्ठपणाच्या समस्या भेडसावत आहे.
शरीराचे वाढत्या वजनामुळे अनेक आजारा उद्भवण्याची शक्यता असते. लठ्ठपणा हा सुध्दा एखाद्या आजारापेक्षा कमी नाही.
आपल्या दैनंदिन आयुष्यातील चुकीच्या सवयींमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा धोका संभवतो. अशाच सकाळच्या काही चुकीच्या सवयी लठ्ठपणासाठी कारणीभूत आहेत.
जर तुम्हाला सकाळी उशीरा उठायची सवय असेल, तर ही सवय आजच बदला. कारण यामुळे तुमचे वजन वाढू शकते.
बऱ्याचदा लोक पाणी पिण्यास टाळाटाळ करतात. यामुळेही तुमचे वजन वाढते. त्यामुळे आजपासूनच सकाळी पाणी प्यायला सुरूवात करा.
सकाळी नाश्ता करणे अत्यंत गरजेच आहे. नाश्ता न केल्यामुळे ओव्हर डायटिंची समस्या होते. यामुळे वजन वेगाने वाढते.
सकाळी चहा कॉफीसारखे पेय प्यायल्यामुळे शरीरातील कॅलरीचे प्रमाण वाढते. त्यामुळे सकाळी गोड चहा घेणे टाळा.
या काही छोट्या सवयी अंगिकारल्यास वाढत्या वजनाच्या समस्येपासून सुटकारा मिळेल. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.