Mahesh Gaikwad
आरोग्याच्या छोट्या-मोठ्या समस्यांसाठी आजही अनेक लोक घरगुती उपचार करतात.
घरामध्येच उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा वापर करून अनेक आजार बरे होतात. उदाहरणच द्यायचे झाले हळद दुधामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.
आपल्या घरामध्ये अनेक अशा वस्तू किंवा पदार्थ असतात, ज्यामुळे छोटे-मोठे आजारांसाठी फायदेशीर असतात.
आज आपण घरात उपलब्ध असणाऱ्या गुळाचे आरोग्यदायी फायदे काय आहेत, याची माहिती पाहणार आहोत.
गुळामध्ये असणारे पाचक घटक तुमची पचनक्रिया सुधारण्याासाठी उपयुक्त असतात. ज्यामुळे तुमची पचनशक्ती मजबूत होते.
याशिवाय बध्दकोष्ठ, अपचन, गॅस यासारख्या पोटाच्या समस्यांमध्ये गूळ खाणे फायदेशीर असते.
अनेकांच्या रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता असते. गुळाच्या सेवनामुळे हिमोग्लोबिनची कमी दूर होण्यास मदत होते.
अनेकांना हाडांच्या समस्या असतात. गुळाच्या सेवनामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.
गुळामध्ये नैसर्गिकत: साखर असल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी गूळ खाणे टाळले पाहिजे. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.