Mahesh Gaikwad
लसूण केवळ जेवणाची चव वाढविण्यासाठीच नाही तर, आरोग्याच्यादृष्टीनेही खूप फायजेशीर आहे.
लसणाला असलेल्या उग्र वासामुळे अनेकजण कच्चा लसूण खात नाहीत. कच्चा लसूण खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
लसणामध्ये कार्बोहायड्रेट्स, कॉपर, झिंक, फॉस्फरस, प्रोटीन, व्हिटामिन, मँग्निज, कॅल्शिअम, सेलेनियम यासह आयर्न, पोटॅशिअम यासारखे विविध औषधी घटक असतात.
जर तुम्ही दररोज लसणाच्या दोन पाकळ्या सकाळी उपाशीपोटी चावून खाल्ल्यास आरोग्याचे काय-काय फायदे होतात. याची माहिती आज आपण पाहणार आहोत.
दररोज सकाळी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्यास ह्रदयाचे आरोग्य सुधारते. तसचे यामुळे स्ट्रोक्सचा धोकाही कमी होतो.
लसणामध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे रोज उपाशीपोटी लसूण खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
लसणामध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. सकाळी दोन पाकळ्या लसूण चघळल्यास तोंडाचे आरोग्य सुधारते. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.