Mahesh Gaikwad
आजकाल पुरूषांपासून स्त्रियांमध्ये अनेकांना केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
केसांची गळती रोखण्याासाठी महागड्या ट्रिटमेंट करण्यासह अनेकजण वेगवेगळे उपाय करतात.
महागड्या ट्रिटमेंट करूनही केसांची गळती थांबत नाही. अशावेळी आपल्या घरीच उपलब्ध असणाऱ्या काही गोष्टी वापरून तुम्ही केस गळती रोखू शकता.
जास्ंवदाचे फूल केसाच्या संबंधित समस्यांवर अत्यंत गुणकारी मानले जाते. जास्वंदाचे फूल आणि पानांचा वापर करून केस गळतीच्या समस्येपासून सुटका मिळेल.
सर्वप्रथम जास्वंदाची पाने आणि फुले मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट करून घ्या.
तयार झालेल्या या पेस्टमध्ये थोडे दही घालून चांगले मिसळून घ्या. हे मिश्रण तोपर्यंत मिसळत राहा, जोपर्यंत ते सॉफ्ट होत नाही.
आता हे सॉफ्ट झालेली पेस्ट तुमच्या केसांवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर ही पेस्ट कोमट पाण्याने धुवून टाका.
आठवड्यातून दोनवेळा ही पेस्ट केसांना लावल्यास केस गळतीची समस्या रोखण्यास मदत होईल. ही बातमी सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.