Mahesh Gaikwad
बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे जगभरात मोठ्या संख्येने लोक लठ्ठपणाच्या समस्येमुळे ग्रासलेले आहेत.
लठ्ठपणामुळे शरीर बेढब तर दिसतेच पण यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवण्याचा धोकाही असतो.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक जीममध्ये तासंतास घाम गाळण्यापासून अनेक उपाययोजना करतात. पण तुम्हाला झटपट वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही न्युट्रीशनिस्ट रिचा गंगानी यांचा एक खास फॉर्म्युला फॉलो करू शकता.
रिचा गंगानी यांनी इन्स्टग्रामवरून एक व्हिडीओ शेअर करून सांगितले आहे की, त्यांनी १८-१०-८-४-१ हा रुल फॉलो करून एका महिन्यापेक्षा कमी दिवसांत २१ किलो वजन कमी केले आहे.
तर चला जाणून घेवूयात रिचा गंगानी यांचा वजन कमी करण्याचा खास फॉर्म्युला नक्की काय आहे? हा फॉर्म्यला एक प्रकारचा इंटरमिटेंट फास्टिंग आहे. या फॉर्म्युलानुसार दिवसातील २४ तासांत १८ तास उपाशी राहणे.
१८ तास उपाशी राहिल्यानंतर उर्वरित वेळामध्ये संतुलित आहार घ्यावा. जर तुम्ही सकाळी १० वाजता जेवण केले असेल, तर पुढील जेवण १८ तासांनी घ्यावे.
१८ तास उपाशी राहण्याबरोबरच दररोज १० हजार पावले चालणेही आवश्यक आहे. यामुळे शरीरातील कॅलरीज वेगाने कमी होतात.
पुरेशी झोप न घेतल्यानेही लठ्ठपणा वाढतो. यासाठी दररोज ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. याशिवाय दररोज ४ लिटर पाणी प्यावे.
दिर्घकाळ उपाशी राहिल्यामुळे शरीर कमजोर होवू नये, यासाठी प्रतिकिलो वजनाच्या १ ग्रॅम प्रोटीन घ्यावे. या माहितीशी अॅग्रोवन सहमत नाही. अधिक माहितीसाठी आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.