Mahesh Gaikwad
सध्या देशभर उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. उन्हाच्या झळांपासून शरीराला वाचविण्यासाठी अनेकजण शीतपेय, सरबत, ज्यूस यांचा आधार घेतात.
असंही उन्हाळ्यात खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक असते.
उन्हाळ्याच्या दिवसातं अनेकजण दही खाण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्यात दररोज दही खाल्ल्याने अनेक फायदे होतात.
दह्यामध्ये कॅलरींचे प्रमाण कमी असते. तसेच यामध्ये फॅटचे प्रमाणही कमी असते.
दह्यामध्ये हेल्दी बॅक्टेरिया आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी चांगले असतात.
उन्हाळ्याच्या दिवसात दही खाल्ल्यामुळे शरीर हायड्रेट राहते.
तसेच उन्हाळ्यात होणाऱ्या संसर्गांपासून दही खाल्ल्यामुळे बचाव होतो. मात्र, अतिप्रमाणआत दही खाणेही टाळावे.