Mahesh Gaikwad
पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे अनेक जणांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. या दिवसांत लहान मुले लगेच आजारी पडतात.
आजारी पडल्यानंतर लहान मुले औषधे घ्यायला टाळाटाळ करतात. त्यामुळे आज आम्ही लहान मुलांसाठी खास गोड काढा कसा करायचा याची माहिती सांगणार आहोत.
हा काढा तयार करण्यासाठी तुळशीची काही पाने आणि बेदाणे धुवून घ्या. त्यानंतर दालचिनी आणि काळी मिरी मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पावडर करून घ्या.
आता तुळशीची पाने, बेदाणे आणि दालचिनी, काळ्या मिरीची पावडर एकत्र करून त्यामध्ये एक आल्याचा तुकडा घालून हे मिश्रण चांगले ठेचून घ्या.
आता एका भांड्यात दोन ग्लास पाणी घ्या. हे पाणी १५ मिनीटांपर्यंत चांगले उकळून घ्या थंड करून घ्या.
त्यानंतर एका पॅनमध्ये तयार केलेले मिश्रण पाण्यासोबत टाकून उकळून घ्या. एक ग्लास पाणी उरल्यानंतर हा गरम काढा गाळून घ्या.
आता यामध्ये थोडा लिंबाचा रस आणि मध किंवा गूळ घालून लहान मुलांना प्यायला द्या. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.