Mahesh Gaikwad
फळांचा राजा आंबा हे एक हंगामी फळ आहे. विशिष्ट चव आणि सुगंधासाठी आंब्याचे फळ प्रसिध्द आहे.
आंबा केवळ खाण्यासाठीच गोड नसतो. तर, त्याचे आरोग्यासाठीचे फायदेही भरपूर आहेत. आंब्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.
परंतु केवळ आंब्याचे फळच नाही, तर त्याची पाने चघळणेही आरोग्यासाठी गुणकारी मानले जातात.
आंब्याची पाने चघळल्याने ह्रदयाच्या संबंधित समस्यांपासून आराममिळतो. संसर्गापासून बचावासाठीही आंब्याची पाने चघळणे फायदेशीर आहे.
एवढच काय तर आंब्याची पाने चघळल्याने तुमचे वाढलेले वजनही कमी होण्यास मदत होते.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मधुमेहाच्या रूग्णांसाठी आंब्याची पाने चघळणे फायदेशीर आहे.
आंब्याची पाने पोटाच्या समस्यांवर गुणकारी आहेत. यामुळे पचनाची क्रिया सुधारण्यास मदत होते.
याशिवाय रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही आंब्याची पाने गुणकारी आहेत. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.