Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड काढायचंय? ; जाणून घ्या प्रक्रिया

Mahesh Gaikwad

शेती कर्ज

देशातील शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरांमध्ये कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात.

Kisan Credit Card | Agrowon

शेतीचा खर्च

देशातील अनेक राज्य सराकरेही शेतकऱ्यांसाठी कमी व्याजदराच्या कर्जाच्या योजना राबतात. ज्यातून शेतकरी शेतीचा खर्च भागवतात.

Kisan Credit Card | Agrowon

किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड हीसुध्दा शेतकऱ्यांसाठीची अशीच एक योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतात.

Kisan Credit Card | Agrowon

शेतकरी कर्ज

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्याही हमी किंवा तारणाशिवाय १ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज दिले जाते.

Kisan Credit Card | Agrowon

पीकविमा

याशिवाय शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे पीकविम्याची सुविधाही दिली जाते. तसेच अपघात होवून अपंगत्व अथवा मृत्यू झाल्यास विमासुध्द मिळतो.

Kisan Credit Card | Agrowon

अर्जाची प्रक्रिया

किसान क्रेडिट कार्ड बनविण्यासाठी शेतकऱ्याला जवळच्या बँकेत जावे लागेल. येथे अर्जासोबत शेतकऱ्याला ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला यासारखी कागदपत्रे जोडावी लागतील.

Kisan Credit Card | Agrowon

अर्जाची पडताळणी

अर्जासोबत सर्व कागदपत्रे बँकेत जमा करा. यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल आणि तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड जारी केले जाईल.

Kisan Credit Card | Agrowon