Swapnil Shinde
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिल्कियारा-बरकोट दरम्यान बांधण्यात येत असलेल्या बोगद्यात झालेल्या दुर्घटनेला 10 दिवस झाले आहेत.
आतमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम अजूनही सुरू आहे.
कामगार ज्या भागात अडकले आहेत तो भाग 8.5 मीटर उंच आणि दोन किलोमीटर लांब आहे.
बोगद्याच्या आतील माती बर्याच ठिकाणी अतिशय भुसभुशीत आहे. अनेक ठिकाणी झऱ्यातून पाणी वाहत असल्याने दरड कोसळण्याचा धोका आहे.
NHIDCL बोगद्याच्या आत कामगारांसाठी एक वेगळा बोगदा बांधत आहे
सोमवारी रात्री उशिरा सहा इंची पाईपद्वारे खिचडी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात यश आले
एंडोस्कोपिक कॅमेरेद्वारे बोगद्यात अडकलेले सर्व ४१ मजूर कॅमेऱ्यात दिसत होते. सर्वजण सुरक्षित आहेत.