Mahesh Gaikwad
भारतीय जेवणांमध्ये विशेषत: उत्तरेकडील भागात जेवणामध्ये बटर आणि लोणी मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते.
बटर हा एक दुग्धजन्य पदार्थ असून यामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे प्रमाणापेक्षा अधिक बटर खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
बाजारात मिळणाऱ्या बटरमध्ये सोडियम आणि फॅटचे प्रमाण अधिक असते, यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढू शकते.
शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे याचा थेट परिणाम तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यावर होतो.
याशिवाय जास्त प्रमाणात बटर खाल्ल्यामुळे रक्तदाब आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवते.
तसेच बाजारात मिळणारे बटर प्रमाणापेक्षा जास्त खाण्याने कर्करोग होण्याचाही धोका संभवतो.
अधिक प्रमाणात बटर खाल्ल्याने ह्रदविकाराचा धोकाही संभवतो. ही बातमी सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.