sandeep Shirguppe
मक्याच्या कणीसामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात आढळतात.
रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉल कॉर्नच्या फायबरमधून साफ होण्यास मदत होते. यासोबतच हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
मधुमेहाच्या रुग्णांना मक्याचे फायबर वरदान असल्याने मका खाल्ल्याने साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.
कॉर्नच्या फायबरमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
ज्या लोकांना अनेकदा पोट किंवा पचनाच्या तक्रारी असतात. त्यांनी कॉर्नचे तंतू नक्कीच खावेत.
मक्यामध्ये फॉलिक अॅसिड हे मूल आणि आई दोघांसाठीही खूप फायदेशीर आहे. मुलाच्या मेंदूच्या विकासात फॉलिक अॅसिड महत्त्वाची भूमिका बजावते.
मक्याचे कणीस जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम समृद्ध असतात. हे व्हिटॅमिन 'बी'चा चांगला स्रोत आहे.
अनेकांना पावसात सर्दीचा त्रास जाणवू लागतो अशावेळी मक्याचे दोन तुकडे करुन त्याचा सुगंध घेतल्यास सर्दी देखील कमी होते.