sandeep Shirguppe
आपल्या आहारात वेलचीला अनन्यसाधारण महत्व आहे. याचे आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत.
वेलचीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 6, प्रोटीन, फायबर, रिबोफ्लेविन, घटक असतात.
वेलची आणि दूध एकत्र करून पिल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात. कमजोर लोकांसाठी हे मिश्रण महत्वाचे मानले जातं.
दूध आणि वेलचीमध्ये भरपूर कॅल्शियम असते अशा परिस्थितीत दुधात वेलची मिसळली की त्यातील पोषकतत्त्वात वाढ होते.
वेलचीचे दूध हाडांच्या मजबुतीसाठी खूप चांगले मानले जाते. वृद्ध लोकांना विशेषतः वेलची मिसळलेले दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.
वेलची आणि दूध या दोन्हीमध्ये मॅग्नेशियम आढळते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते याने रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येतं.
पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यासाठी फायबरची मोठी भूमिका असते. दूध आणि वेलची या दोन्हीमध्ये फायबर आढळते.
तोंडात अल्सर होण्याची समस्या असेल तर वेलचीचे दूध प्यायल्याने अल्सरच्या समस्येपासून सुटका मिळते.