Agriculture Subsidy : नैसर्गिक शेतीसाठी अनुदान देणाऱ्या तीन योजनांबद्दल जाणून घ्या

Mahesh Gaikwad

नैसर्गिक शेती

शेतकऱ्यांचा शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकार सेंद्रिय शेतीसह नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यावर भर देत आहे.

Natural Farming | Agrowon

सेंद्रिय अन्न

आरोग्याप्रती जागरूक असणाऱ्या ग्राहकांमध्ये सेंद्रिय अन्नाविषयी जागरूकता वाढली आहे. कारण सेंद्रिय अन्नपदार्थ सुरक्षित आणि आरोग्यदायी असतात.

Natural Farming | Agrowon

सेंद्रिय भाज्या

याशिवाय सेंद्रिय अन्नपदार्थ रसायन आणि किटकनाशकमुक्त असतात. यामुळे शहरांमध्ये सेंद्रिय भाज्या आणि फळांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसते.

Natural Farming | Agrowon

सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेतीसह नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना अनुदान देते. आज आपण याच योजनांची माहिती पाहणार आहोत.

Natural Farming | Agrowon

परंपरागत कृषी विकास योजना

परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत नैसर्गित शेतीसाठी बियाणे, जैविक खते, जैविक किटकनाशके यासारख्या सेंद्रिय निविष्ठांसाठी प्रतिहेक्टर ३१ हजार रुपये अनुदान मिळते.

Natural Farming | Agrowon

नमामि गंगे प्राकृतिक खेती कार्यक्रम

नमामि गंगे प्राकृतिक खेती कार्यक्रम या योजनेअंतर्गत नैसर्गिक शेतीसाठी अनुदान दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून सरकार नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे.

Natural Farming | Agrowon

भारतीय प्राकृतिक खेती कृषी पध्दती

भारतीय प्राकृतिक खेती कृषी पध्दती या योजनेअंतर्गत नैसर्गिक शेतीसाठी अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत तीन वर्षांसाठी प्रतिहेक्टर १२ हजार २०० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

Natural Farming | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....