Mahesh Gaikwad
प्रत्येकाला सुंदर, गोरी, मुलायम आणि चमकदार त्वचा हवी असते. यासाठी लोक हजारो रुपये कॉस्मेटीक्सवर खर्च करतात.
कितीही महागड्या क्रीम लावल्या तरी पाहिजा तसा त्वचेचा रिझल्ट मिळत नाही. तर तुम्ही घरच्या घरी तयार केलेली पपाया फेस क्रीम वापरू शकता.
पपाया फेस क्रीम घरच्या घरी तयार करणे अगदी सोपे असून ही क्रीम खूप परिणामकारकही आहे.
पपाया फेस क्रीम तयार करण्यासाठी एका वाटीत कोरफडीचा गर घ्या. त्यामध्ये ग्लिसरीन टाका. त्यानंतर त्यामध्ये 'व्हिटामिन-ई'च्या २ कॅप्सूल आणि एरंडीचे तेल टाका.
आता या मिश्रणामध्ये थोडाथोडा पपईचा रस टाकून हळूहळू मिसळत राहा. जेव्हा हे मिश्रण क्रीमसारखे दिसायला लागल्यावर ते काहीवेळासाठी तसेच ठेवून द्या.
आता तयार झालेली क्रीम दिवसातून दोनवेळा चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळेडाग आणि सुरकुत्या कमी होतात.
ही क्रीम चेहऱ्यावर लावण्याआधी क्रीम हाताच्या त्वचेवर लावावी, जर या ठिकाणी काही जळजळ झाली नाही तर ही क्रीम वापरू शकता. संवेदनशील किंवा अॅलर्जी असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.