Anuradha Vipat
कपाटातील न लागणारे, तुटलेले डबे आणि मुदत संपलेले अन्नपदार्थ सर्वप्रथम बाहेर काढा.
रोज लागणारे मसाले, तेल आणि डाळींचे डबे हाताशी सहज येतील अशा कप्प्यांमध्ये ठेवा.
स्टीलऐवजी काचेच्या किंवा पारदर्शक डब्यांचा वापर करा, जेणेकरून आतील वस्तू शोधणे सोपे होईल.
भिंतींवर हुक्स आणि रॅक लावून चमचे, पॅन आणि सुऱ्या अडकवा, ज्यामुळे ओट्यावरील जागा वाचेत.
स्वयंपाकाचा भाग, भांडी धुण्याचा भाग आणि ओला-सुका कचरा ठेवण्याची जागा निश्चित वेगळी ठेवा.
एकाच प्रकारच्या डब्यांवर स्केच पेन किंवा स्टिकरने साहित्याची नावे लिहा, जेणेकरून गोंधळ होणार नाही.
स्वयंपाक पूर्ण झाल्यावर ओटा आणि गॅस लगेच पुसून घ्या, भांडी सिंकमध्ये साचू देऊ नका.