Anuradha Vipat
स्वयंपाकघरातील कामे सोपी आणि जलद करण्यासाठी खालील काही 'स्मार्ट टिप्स' तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.
आलं-लसूण पेस्ट, भाजलेल्या कांद्याचं वाटण किंवा नारळाचं चव आठवड्याच्या सुरुवातीलाच करून फ्रीजमध्ये ठेवा.
कडधान्ये गरम पाण्यात अर्धा ते एक तास भिजत ठेवा. यामुळे ती लवकर फुगतात आणि शिजायला सोपी जातात.
मेथी, कोथिंबीर किंवा पालक निवडून, कोरड्या सुती कापडात गुंडाळून डब्यात भरून ठेवा. यामुळे भाज्या जास्त काळ ताज्या राहतात .
लसूण सोलण्यापूर्वी ५-१० मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा किंवा लसणाच्या पाकळ्या तव्यावर हलक्या गरम करा.
डाळ किंवा तांदूळ शिजत घालण्यापूर्वी किमान १५-२० मिनिटे साध्या पाण्यात भिजत ठेवा. यामुळे ते कुकरमध्ये लवकर शिजतात.
मिरच्या चिरण्यापूर्वी हाताला थोडे खोबरेल तेल लावा. तसेच मिरच्यांचे देठ काढून डब्यात साठवल्यास त्या जास्त दिवस टिकतात.