Anuradha Vipat
पिंपल्स येण्यामागे केवळ त्वचाच नाही तर आपल्या रोजच्या काही सवयी देखील कारणीभूत असतात.
आपल्या रोजच्या काही सवयी बदलल्यास तुम्ही पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
जेव्हा आपण वारंवार चेहऱ्याला हात लावतो, तेव्हा हे जीवाणू त्वचेच्या छिद्रांमध्ये जातात आणि पिंपल्स तयार होतात.
पिंपल्स फोडल्यामुळे त्यातील संसर्ग आजूबाजूच्या त्वचेवर पसरतो आणि अधिक पिंपल्स येतात.
रात्री झोपण्यापूर्वी मेकअप न काढल्यास त्वचेची छिद्रे बंद होतात. यामुळे पिंपल्स येतात.
जास्त प्रमाणात तेलकट, तिखट, जंक फूड आणि साखरेचे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील उष्णता वाढते आणि पिंपल्स येतात.
जास्त ताण घेतल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्यामुळे त्वचेतून जास्त तेल स्त्रवते आणि पिंपल्स येतात.