Swapnil Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाचे आगमन झाले. यावेळी सहकुटुंब मोठ्या भक्तिभावाने त्यांची प्राणप्रतिष्ठा करून मनोभावे पूजन केले.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे श्री. गणेशाची स्थापना करण्यात आली.
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील पंढरी या निवासस्थानी आज श्री गणरायाचे आगमन झाले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्या नागपूर येथील निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी श्री गणेशाचे आगमन झाले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील निवासस्थानी गणरायाची विधिवत पूजन करून स्थापना केली.