KisaanAI : 'किसान एआय'मुळे शेती झाली सोपी; मिळणार प्रत्येक समस्येचे समाधान

Roshan Talape

किसान एआय

शेतीत सुधारणा घडवण्यासाठी तसेच नवनवीन उपाय शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण साधन ठरत आहे. याच अनुषंगाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने पीएम किसान एआय चॅटबॉट लाॅंच केला आहे.

KisaanAI | Agrowon

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास मदत

KisaanAI हे चॅटबाॅट शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देते आणि शेतकऱ्यांंच्या समस्या सोडविण्यास मदत करते.

Help to solve the problems of farmers | Agrowon

KissanAI अॅपचा वापर

गुगल प्ले स्टोअरवरून KissanAI ॲप डाउनलोड करावे. हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही Ask AI बटणावर क्लिक करून प्रश्न विचारू शकता.

Using the KissanAI App | Agrowon

24x7 उपलब्धता

शेतकरी त्यांच्या समस्या किसान एआय चॅटबॉटला कधीही, कोणत्याही वेळी आणि कोठूनही विचारू शकतात.

24x7 Availability of the App | Agrowon

मातृभाषेतील माहिती

KissanAI अॅप चॅटबॉट एकूण 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत माहिती मिळते.

Information in Different Languages | Agrowon

अचूक माहिती

हे चॅटबॉट्स शेती संबंधित डेटाबेसशी जोडलेले आहेत, त्यामुळे त्यांनी दिलेली माहिती अगदी अचूक मिळण्यास मदत होते.

Accurate Information | Agrowon

शेतीबद्दल योग्य माहिती

या अॅपच्या मदतीने शेतकऱ्यांना सरकारी योजनांची माहिती मिळणार आहे. तसेच शेती आणि योजनांबाबत काही समस्या असतील तर या चॅटबॉटद्वारे मदत मिळणार आहे.

Information about Government Schemes | Agrowon

iPhone 16 : नव्या स्मार्ट फीचर्ससह आयफोन 16 ची धमाकेदार एंट्री; खरेदीसाठी अॅपल चाहत्यांच्या रांगा...

अधिक माहितीसाठी