Roshan Talape
बहुचर्चित आयफोन 16 सीरीजची विक्री आजपासून भारतात सुरू झाली आहे. या सीरिजमध्ये iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max असे चार मॉडेल आहेत.
आकर्षक डिझाइन आणि OLED तंत्रज्ञान अशा नव्या शैलीत iPhone 16 लॉन्च करण्यात आला आहे. यात मोठा आणि क्लिअर डिस्प्ले युजर्सना अतिशय उत्कृष्ट अनुभव देणार आहे.
iPhone 16 मध्ये A18 बायोनिक चिप असेल, ज्यामुळे फोनचा परफॉर्मन्स अधिक वेगवान आणि पॉवरफुल होईल. गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उत्तम अनुभव मिळणार आहे.
या स्मार्टफोनमध्ये 48MP चा मेन कॅमेरा असेल ज्यामध्ये अत्याधुनिक सेंसर आणि AI आधारित फिचर्स असतील. यामुळे रात्रीचे फोटो आणि 4K व्हिडिओ अधिक स्पष्ट टिपण्यास मदत मिळेल.
तसेच iPhone 16 ची बॅटरी लाइफ अधिक चांगली असणार आहे. यातील अॅडव्हान्स्ड बॅटरी ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञानामुळे एकदा चार्ज केल्यावर तुम्ही दिवसभर आपल्या फोनचा वापर करू शकता.
iPhone 16 मध्ये प्रायव्हसीवर विशेष भर दिला आहे. डेटा एन्क्रिप्शन आणि नवीन सिक्युरिटी फीचर्समुळे युजर्सची वैयक्तिक माहिती आणि डेटा पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यास मदत होते.
iPhone 16 मध्ये अधिक चांगली 5G कनेक्टिव्हिटी आहे. ज्यामुळे इंटरनेट स्पीड वाढेल आणि वेगवान डाउनलोड्स होतील.
iPhone 16 स्टायलिश रंगांच्या पर्यायांसह उपलब्ध आहे. यात स्टायलिश मिडनाईट ब्लॅक, फ्रेश ओशन ब्लू, एलिगंट पर्ल व्हाइट, ट्रेंडी सनसेट ऑरेंज, लक्झरी वायन रेड या 5 व्हेरिएंट्समध्ये बाजारात उपलब्ध आहे.
iPhone 16 बेस व्हेरिएंट 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 79,900 रुपयांपासुन सुरु आहे. तर Apple ची अधिकृत वेबसाइट, Amazon, Flipkart आणि Vijay Sales सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि किरकोळ आउटलेटवरसुद्धा हा स्मार्टफोन मिळेल.