Anuradha Vipat
किडनी स्टोन (मुतखडा) ही आजकाल अतिशय सामान्य झालेली समस्या आहे.
शरीरात युरिनरी ट्रॅक मध्ये खनिजे आणि मिठाचे खडे जमा होतात, ज्याला आपण मुतखडा म्हणतो.
शरीरात पुरेसे पाणी न गेल्याने लघवी घट्ट होते आणि खनिजे जमा होऊन खडे तयार होऊ लागतात.
जास्त प्रमाणात मीठ (सोडियम), चहा, कॉफी, चॉकलेट, आणि मांसाहार (प्रोटीन) केल्याने स्टोनचा धोका वाढतो.
वजन जास्त असणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे शरीराची चयापचय क्रिया बिघडते.
एक ग्लास पाण्यात एक लिंबाचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिक्स करून प्या.
आयुर्वेदात कुळीथ मुतखड्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. कुळीथ पाण्यात उकळून ते पाणी गाळून रोज सकाळी पिण्याने जुन्यात जुना खडाही विरघळून तुटतो.