Anuradha Vipat
किडनी हा आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे, जो रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करतो.
किडनी निकामी होण्याचा धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत खालील बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.
पुरेसे पाणी प्यायल्याने किडनीला रक्तातील सोडियम आणि विषारी घटक गाळून लघवीवाटे बाहेर काढणे सोपे जाते.
अन्नात मिठाचे प्रमाण कमी ठेवा. जास्त सोडियममुळे रक्तदाब वाढतो, ज्याचा थेट परिणाम किडनीवर होतो.
रक्तातील साखर वाढल्यास किडनीच्या फिल्टरेशन प्रक्रियेवर ताण येतो. त्यामुळे गोड पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवा.
डोकेदुखी किंवा अंगदुखीसाठी वारंवार 'पेनकिलर्स' घेण्याची सवय किडनीसाठी घातक ठरू शकते.
शरीराचे वजन वाढल्यास किडनीला जास्त काम करावे लागते, त्यामुळे नियमित व्यायाम करून वजन नियंत्रणात ठेवा