Anuradha Vipat
अनेकदा आपण बाजारातून आवडीने ताजी फळे आणतो, पण दोन-तीन दिवसांतच ती सडू लागतात किंवा सुकतात.
फळे साठवण्याच्या काही सोप्या आणि शास्त्रीय ट्रिक्स वापरल्यास, तुम्ही फळे दीर्घकाळ ताजी, रसरशीत आणि खाण्यायोग्य ठेवू शकता.
केळीच्या वरच्या भागाला ॲल्युमिनियम फॉइल किंवा प्लॅस्टिक रॅप गुंडाळून ठेवा. केळी ५ ते ६ दिवस काळी पडत नाहीत.
सफरचंद इतर फळांच्या जवळ ठेवले, तर ती फळे वेगाने पिकून सडू लागतात. म्हणूनच सफरचंद नेहमी वेगळ्या टोपलीत ठेवावे.
बाजारातून द्राक्षे, स्ट्रॉबेरी किंवा चेरी आणल्यानंतर त्या लगेच धुवून फ्रिजमध्ये ठेवू नका. ओलसरपणामुळे त्यांना बुरशी लागते.
संत्री, मोसंबी आणि लिंबू ही फळे फ्रिजमध्ये ठेवताना कधीही प्लॅस्टिकच्या पिशवीत बंद करून ठेवू नका.
अख्खे टरबूज किंवा खरबूज खोलीच्या तापमानाला बाहेरच ठेवावे. कापल्यानंतर मात्र त्याचा उरलेला भाग क्लिंग फिल्मलावून फ्रिजमध्ये ठेवावा.