Fasting Special : फळांपासून बनवा उपवासाचे हे एनर्जी बूस्टर पदार्थ; रेसिपी इतकी सोपी की मिनिटांत होईल तयार

Anuradha Vipat

फळांचे पदार्थ

उपवासाच्या दिवशी शरीराला तातडीने ऊर्जा मिळण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी फळांचे पदार्थ खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.

Fasting Special | agrowon

थकवा

फळांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहते आणि उपवासामुळे येणारा थकवा दूर होतो.

Fasting Special | Agrowon

फ्रूट कस्टर्ड

सफरचंद, केळी, डाळिंब, द्राक्षे , ताजे घट्ट दही किंवा दुधाची साय , साखर किंवा मध, आणि वेलची पूड.

कसे बनवावे: एका बाऊलमध्ये घट्ट दही किंवा साय फेटून घ्या. त्यात चवीनुसार साखर/मध आणि वेलची पूड मिक्स करा. आता सर्व चिरलेली फळे यात घालून थंड करून सर्व्ह करा.

Fasting Special | Agrowon

उपवासाचे फळांचे रायते

दही, बारीक चिरलेले सफरचंद, केळी, डाळिंबाचे दाणे, भाजलेल्या जिऱ्याची पूड, आणि सेंधैव मीठ

कसे बनवावे : दही छान फेटून घ्या. त्यात सेंधैव मीठ, जिरे पूड आणि थोडी साखर घाला. सर्व फळे एकत्र करून मिक्स करा.

Fasting Special | agrowon

बनाना-खजूर स्मूदी

२ केळी, ३-४ मऊ खजूर, १ ग्लास थंड दूध, आणि आवडीनुसार सुका मेवा. मिक्सरच्या भांड्यात केळी, खजूर आणि थोडे दूध टाकून बारीक पेस्ट करा. नंतर उरलेले दूध घालून पुन्हा एकदा फिरवून घ्या.

Fasting Special | agrowon

बटाटा-सफरचंद हलवा

कढईत तूप गरम करून किसलेले सफरचंद ५ मिनिटे परतून घ्या. सफरचंद मऊ झाल्यावर त्यात आवडीनुसार साखर आणि थोडे दूध घाला. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा आणि वरून सुका मेवा टाकून गरमागरम खायला द्या.

Fasting Special | agrowon

मीठ वापरताना काळजी

उपवासाच्या पदार्थांमध्ये नेहमीच्या मिठाऐवजी फक्त सेंधैव मिठाचा वापर करा.

Fasting Special | agrowon

Clean Vegetables Tips : भाज्या नुसत्या पाण्याने धुताय? सावधान! कीटकनाशके स्वच्छ करण्यासाठी वापरा या टिप्स

Clean Vegetables Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...