Anuradha Vipat
करवा चौथ सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो . या सणाला विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी प्रर्थना करतात.
करवा चौथ हे व्रत वैवाहिक जीवनातील प्रेम आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते.
करवा चौथ हा सण प्रामुख्याने उत्तर भारतीय राज्यांमध्ये साजरा केला जातो
२०२५ मध्ये करवा चौथ सण शुक्रवार १० ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.
करवा चौथ या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री ८ वाजून १३ मिनिटे असणार आहे
करवा चौथ पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ५ वाजून ५७ मिनिटे ते रात्री ७ वाजून ११ मिनिटांपर्यंत असणार आहे
चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्र देवतेला जल अर्पण केल्यानंतरच उपवास सोडला जातो