Mahesh Gaikwad
डोंगर खोऱ्यात मिळणारा रानमेवा म्हणजे करवंद. हे एक असे फळ आहे, जे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खायला मिळते. याची चव आंबट-गोड अशी असते.
करवंद हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. यामधील पोषक तत्त्वांमुळे पोटाशी संबंधित सर्व समस्यांपासून आराम मिळतो.
करवंदामध्ये अनेक पोषक तत्त्व असतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
करवंद हे व्हिटामिन-सी या जीवनसत्त्वाचा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे रोगप्रतिकार शक्तीतर वाढतेच परंतु शरीराचा वेगवेगळ्या संसर्गापासून बचावही करते. यामुळे शरीर निरोगी राहते.
करवंदामध्ये फायबर घटक मुबलक असतात. जे तुमची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. तसेच यामुळे पोटही व्यवस्थित साफ होते.
याशिवाय अपचन, जेवणानंतर पोट फुगण्याची समस्या यासारख्या आजारातही करवंद खाणे फायदेशीर आहे.
यामध्ये व्हिटामिन-सी आणि लोह हे घटक भरपूर प्रमाणात असतात. करवंद त्वचेच्या आरोग्यासाठीही खूप गुणकारी आहे.
करवंदाच्या याच गुणांमुळे करवंद डायट बॅलन्सर म्हणूनही काम करते. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिकच्या माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.