Kartuli Vegetable : आरोग्यदायी रानभाजी करटुली ची लागवड

Team Agrowon

करटुली ही बारमाही वेल असून, तिला कंदयुक्त मुळे असतात. ४ मीटर लांब द्राक्षाच्या घड्यासारख्या लता तंतू असतात. भारतामध्ये मेघालय राज्यात सर्वांत जास्त प्रमाणात आढळते.

Kartuli Vegetable | Agrowon

कोवळे, नाजूक, हिरव्या रंगाचे कच्चे फळ सामान्यतः भाजी म्हणून वापरले जाते. त्याच्या विशिष्ट कडसर चवीमुळे त्याचे लोकप्रियता वाढत आहे.

Kartuli Vegetable | Agrowon

करटुले पिकाची पाने, फुले व कंदयुक्त मुळे यांचाही आहारामध्ये वापर करता येतो.

Kartuli Vegetable | Agrowon

चांगल्या पावसानंतर जूनअखेर ते जुलै महिन्यामध्ये लागवडीला सुरुवात करावी. हे ११५ ते १२४ दिवसांचे पीक आहे.

Kartuli Vegetable | Agrowon

करटुलीची लागवड केल्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यांमध्ये पीक काढणीला येते. या पिकाच्या ४ तोडणी होतात.

Kartuli Vegetable | Agrowon

करटुले पिकाचे कंद ४ ते ५ वर्षांपर्यंत राहतात. लागवड बिया व कंद लावून दोन्ही प्रकारे करता येते.

Kartuli Vegetable | Agrowon

जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पावसाळ्यातील पावसाचा अंदाज घेऊन ४ चे ५ दिवसांनी किंवा आठवड्याच्या अंतराने एक किंवा दोन वेळा पाणी द्यावे. जास्त पाणी साचू देऊ नये, अन्यथा मुळे कुजून जातात.

Kartuli Vegetable | Agrowon

लागवडीनंतर साधारणतः ५० ते ६० दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते. पहिल्या वर्षी ७५ ते ८० दिवसांनी फळे तोडणी सुरू होते. दुसऱ्या वर्षी ३५ ते ४० दिवसांनी फळांची सुरू होते.

Kartuli Vegetable | Agrowon

फळ हिरवे कोवळ्या स्थितीतच तोडावे. हेक्टरी साधारण ४० ते ५० क्विंटल इतके उत्पादन मिळते.

Kartuli Vegetable | Agrowon
आणखी पाहा...