Anuradha Vipat
नवरात्रीत कन्यापूजन करणे शुभ मानले जाते. नवरात्रीत नऊ कन्यांचे पूजन केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते असं म्हणतात.
नवरात्रीत कन्यापूजन कधी करावे? असा प्रश्न सगळ्यांनाचं पडतो. खरं तर नवरात्रीत नऊ दिवस आपल्या घरातील कन्यांचे पूजन केले तर ते उत्तमचं
शारदीय नवरात्रीत महाअष्टमी आणि महानवमीला मुलींची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
लहान मुलींना देवी दुर्गेचे रूप मानले जाते त्यामुळे नवरात्रीच्या काळात कन्यापूजन हा एक महत्वाचा विधी आहे.
असे मानले जाते की कन्येची पूजा केल्याशिवाय नवरात्रीचे व्रत आणि उपासना सफल होत नाही
कन्यापूजन करताना मुलींसोबत एका मुलालाही बोलावले पाहिजे.
बालक हे बटुक भैरवाचे रूप मानले जाते.