Anuradha Vipat
पावसाळा सुरू झाला की रिमझिम पावसात गरमागरम, कुरकुरीत कांदा भजी आणि आल्याचा कडक चहा खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
टपरीवर मिळते तशी खेकडा भजी आणि परफेक्ट चहा घरच्या घरी फक्त १५ मिनिटांत कशी बनवायची, याची सोपी रेसिपी खालीलप्रमाणे आहे.
कांदा, बेसन, तांदळाचे पीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, ओवा, हळद आणि लाल तिखट, गरम तेल, मीठ, तेल.
चिरलेला उभा कांदा चांगला चोळून मोकळा करा. चवीनुसार मीठ मिक्स करा आणि ५ मिनिटे बाजूला ठेवून द्या. हिरवी मिरची, कोथिंबीर, ओवा, हळद आणि लाल तिखट घाला.
२ चमचे तांदळाचे पीठ आणि बेसन घाला. शेवटी १ चमचा गरम तेल घालून मिक्स करा. पिठाचे गोल गोळे न करता कांदा हाताने सुट्टा सोडत तेलात सोडा. भजी दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
दूध, पाणी, चहापत्ती, साखर, आले, वेलची.
पाणी हलके गरम झाल्यावर त्यात ठेचलेले आले आणि वेलची घाला. पाण्याला उकळी येऊ द्या जेणेकरून आल्याचा अर्क पाण्यात उतरेल. त्यात चहापत्ती आणि साखर घालून २ मिनिटे मंद आचेवर चांगले उकळू द्या. शेवटी १ कप दूध घाला.